व्यावसायिक फुटबॉलपटूसाठी बोल्ट चाचणी देणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 January 2018

पॅरिस - वेगाचा बादशहा उसेन बोल्ट ॲथलेटिक्‍समधून निवृत्त झाल्यानंतर आता व्यावसायिक फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न बाळगून आहे. बोरुसिया डॉर्टमंड या जर्मनीतील अव्वल क्‍लबकडे चाचणी देणार आहे. त्यानंतर बोल्टचे हे स्वप्न प्रत्यक्षात अवतरण्याची शक्‍यता आहे. 

बोरुसिया डॉर्टमंडकडे आपण चाचणी देणार असलो, तरी आपल्याला मॅंचेस्टर युनायटेडकडून खेळायला आवडेल. कारण हा आपला सर्वांत जास्त पसंतीचा क्‍लब आहे, असे बोल्टने सांगितले. मार्च महिन्यात मी डॉर्टमंडकडे चाचणी देणार आहे आणि त्यानंतर मी व्यावसायिक फुटबॉलपटूमध्ये करिअर करण्याचा विचार करणार आहे. त्यांनी जर हिरवा कंदील दिला, तर मला शिस्तबद्ध सराव करावा लागणार आहे. त्यासाठी काही बदलही करावे लागतील, असे बोल्टने सांगितले.

पुमा हे बोल्ट आणि डॉर्टमंड यांचे प्रायोजक आहे आणि त्यांनीच चाचणीचा बेत आखला आहे. चाचणी यशस्वी झाली आणि मी व्यावसायिक फुटबॉलपटू होऊ शकतो, हे स्पष्ट झाल्यावर मी मॅंचेस्टर युनायटेड क्‍लबमध्ये दाखल होण्यास प्राधान्य देईन. युनायटेडचे प्रशिक्षक अलेक्‍स फर्ग्युसन यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. जर फुटबॉल खेळण्याच्या क्षमतेचा असशील, तर तुझ्यासाठी निश्‍चितच प्रयत्न करू, असे फर्ग्युसन यांनी आश्‍वासन दिल्याचे बोल्ट म्हणाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news usen bolt test for business football