फिफा वर्ल्ड कप रशियात, ईर्षा मात्र कोल्हापुरात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 July 2018

कोल्हापूर : फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा रशियात आणि ईर्षा कोल्हापुरात असेच चित्र पाहायला मिळत आहे. बेल्जियमविरूद्ध ब्राझील पराभूत झाल्याने कट्टर ब्राझील विरोधकांच्या विजयाला काल रात्री उधाण आले. संगीताच्या ठेक्‍यावर बेधुंद नृत्य करत विरोधकांनी आनंदोत्सव साजरा केला. ब्राझील समर्थकांनी लगोलग सोशल मीडियावर ब्राझीलच्या समर्थनार्थ पोस्ट टाकत विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास सुरवात केली आहे. 

फुटबॉलपंढरी कोल्हापुरात वरिष्ठ गटात सोळा संघ आहेत. पेठा-पेठांतल्या संघांतील ईर्षा अनेक वर्षांपासून आहे. काही संघांचे कीट ब्राझील, अर्जेंटिनासारखे आहे. स्थानिक संघ ब्राझील, अर्जेंटिना, फ्रान्स, पोर्तुगाल, बेल्जियम, रशियाचे चाहते आहेत. स्पर्धेस सुरवात झाल्यापासून त्याची प्रचिती येत आहे. एका पेठेतील संघ ब्राझील समर्थक, तर दुसऱ्या
पेठेतील संघ ब्राझील विरोधक, असे चित्र पाहायला मिळत आहे. ब्राझील विरूद्ध बेल्जियम सामन्यात ब्राझील समर्थक ब्राझील जिंकावे, तर विरोधक ब्राझील हरावे, यासाठी टी.व्ही.समोर बसले होते. ब्राझीलचा स्वयंगोल झाल्यानंतर विरोधकांनी आतषबाजीही केली. बेल्जियमच्या दुसऱ्या गोलनंतर विरोधकांनी पुन्हा आतषबाजी करत बेधुंद नृत्य केले. त्याचे व्हीडिओ व्हॉटसऍपवर शेअर करण्यात आले. त्यास प्रत्त्युतर म्हणून ब्राझील
समर्थकांनी सोशल मीडियावर "विरोधक कितीही वाढू द्या. आम्हाला फरक पडणार
नाही. कारण आवाज नेहमी चिल्लर करतात नोटा नाही,' असा टोला लगावला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teams in Kolhapur celebrating Brazil's loss