अर्जेंटिना का हरले....

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

प्रशिक्षक सॅम्पोली यांचे नियोजन भयानक होते. मेस्सीला आघाडीवर खेळवण्यापेक्षा त्यांनी मागे का खेळवले कळत नाही. मेस्सीला पास द्या आणि जादू पहा हा सॅम्पोली यांचा "ए' प्लॅन होता. पण, तो अपयशी ठरत असताना त्यांच्याकडे "बी' प्लॅन नव्हता.
-ओसी अर्डिले, अर्जेंटिनाचा माजी खेळाडू

लिओनेल मेस्सीवर अर्जेंटिनाला विश्‍वविजेतपद मिळवून देण्याच्या अपेक्षांचे दडपण
-लिओनेल मेस्सीच्या लोकप्रियतेत संघातील अन्य गुणवत्तेकडे दुर्लक्ष
-मेस्सीच्या लोकप्रियतेचे म्हणा किंवा मोठेपणाचे संघातील खेळाडूंवर पडणारे दडपण

अर्जेंटिना हा मोडकळीला आलेला संघ. त्यांच्यात संघ भावनेचा अभाव. त्यांचे खेळाडू प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळण्यापेक्षा एकमेकांविरुद्ध अधिक खेळतात.
-सेस फॅब्रेगस, स्पेनचा माजी खेळाडू

अर्जेंटिना खेळाडूंची ही सर्वांत खराब कामगिरी म्हणता येईल. ते विश्‍वकरंडक खेळत आहेत असे वाटतच नव्हते. त्यांनी या सामन्यात काहीच केले नाही.
पाब्लो झाबालेटा, अर्जेंटिनाचा माजी खेळाडू

प्रशिक्षक सॅम्पोली यांचे नियोजन भयानक होते. मेस्सीला आघाडीवर खेळवण्यापेक्षा त्यांनी मागे का खेळवले कळत नाही. मेस्सीला पास द्या आणि जादू पहा हा सॅम्पोली यांचा "ए' प्लॅन होता. पण, तो अपयशी ठरत असताना त्यांच्याकडे "बी' प्लॅन नव्हता.
-ओसी अर्डिले, अर्जेंटिनाचा माजी खेळाडू

Web Title: Why did Argentina loose?