झिनेदिन झिदान यांचा रेयाल माद्रिदला बाय बाय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

माद्रिद - ‘रेयाल माद्रिद’ला युरोपियन चॅंपियन्स आणि चॅंपियन्स लीगचे विजेते बनवल्यानंतरही प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांनी ‘रेयाल माद्रिद’चे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

भरगच्च पत्रकार परिषदेत झिदान यांनी या निर्णयाची घोषणा केली. झिदान म्हणाले, ‘‘हा निर्णय माझ्यासाठी कठीण होता. पण, राजीनामा देण्याची हीच योग्य वेळ असल्याची खात्री झाल्यामुळेच आपण हा निर्णय घेतला.’’

सलग तीनवेळा युरोपियन विजेते ठरणारे झिदान हे पहिले प्रशिक्षक आहेत. ते म्हणाले, ‘‘मी या क्‍लबवर नेहमीच प्रेम केले. या संघाने मला खूप काही दिले. मी सर्वप्रथम याच संघाकडून खेळलो. आज मला रेयालसाठी काही तर बदल आवश्‍यक असल्याचे वाटले आणि निर्णय घेऊन टाकला.’’ झिदान यांनी २०१६ मध्ये रॅफेल बेनिटेझ यांच्याकडून रेयालची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी तीन वेळा रेयालला युरोपियन विजेते बनवले. स्पॅनिश साखळीतही त्यांनी रेयालला विजेते केले. बार्सिलोनाला मागे टाकून त्यांनी २०१२ नंतर पहिलेच विजेतेपद मिळविले. आपल्या प्रशिक्षकपदाच्या कालावधीत झिदान यांनी नऊ प्रमुख स्पर्धेंची विजेतिपदे मिळविली.

Web Title: zinedine zidane football trainer