अर्धा मिनीट असताना भारताचा विजयी गोल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

गोल्ड कोस्ट - पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या सेकंदात स्वीकारलेल्या गोलची जणू भरपाई करताना भारताने इंग्लंडविरुद्ध अखेरच्या दोन मिनिटांत दोन गोल केले आणि हॉकीच्या उपांत्य फेरीत जागतिक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची उपांत्य लढत टाळली. 

गोल्ड कोस्ट - पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या सेकंदात स्वीकारलेल्या गोलची जणू भरपाई करताना भारताने इंग्लंडविरुद्ध अखेरच्या दोन मिनिटांत दोन गोल केले आणि हॉकीच्या उपांत्य फेरीत जागतिक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची उपांत्य लढत टाळली. 

मनदीपने पाकविरुद्ध अखेरच्या मिनिटात संधी गमावली होती, अन्यथा भारताने तो सामना ३-१ असा जिंकला असता. त्याच मनदीपने आज अखेरच्या क्षणी गोल केला. त्यावेळी अर्धा मिनीट शिल्लक होता. तर त्यापूर्वी एक मिनीट अगोदर विनय कुमारने गोल केला होता. चार मिनिटे असताना इंग्लंडने ३-२ आघाडी घेतली, त्यावेळी भारतास उपांत्य फेरीत या स्पर्धेत हुकूमत राखलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळावे लागणार असेच वाटत होते. अखेरच्या मिनिटात गोल स्वीकारण्याचे दुखणे असलेल्या भारतीयांनी त्याच कालावधीत दोन गोल करीत बाजी मारली. 

इंग्लंडविरुद्ध अखेरच्या दहा मिनिटांपर्यंत भारताने आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रातील डेव्हिड काँडन याच्या गोलला उत्तर देण्यासाठी भारताने १७ मिनिटे घेतली होती. मनप्रीतने ५१ व्या मिनिटास गोल केल्यावर इंग्लंडने चार मिनिटांत दोन गोल केले.

उर्वरित चार मिनिटांत इंग्लंड आघाडी वाढवणार असे वाटत असतानाच भारतीयांनी धक्कादायक प्रतिकार करीत चित्र बदलले. भारताने गटसाखळीत एकही लढत न गमावता दहा गुणांसह अग्रस्थान मिळवले. 

भारत-इंग्लंड ही ‘ब’ गटातील लढत सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने ‘अ’ गटातील विजेतेपद निश्‍चित केले होते. यामुळे ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत मुकाबला टाळण्यासाठी भारतास गटविजेतेपद हवे होते. इंग्लंडची गोलसरासरी भारतापेक्षा सरस होती, त्यामुळे भारतास बरोबरीही चालणार नव्हती. पाकविरुद्ध गोलचा एकहाती प्रयत्न केलेल्या मनदीपने तिसऱ्या सत्राच्या सुरवातीस मनप्रीतकडे चेंडू पास करण्याची हुशारी दाखवली आणि त्या गोलने भारतीय प्रतिकार सुरू झाला.

५५.२१ इंग्लंडचा तिसरा गोल २-३
५८.२८ भारताचा तिसरा गोल ३-३
५९.२१ भारताचा चौथा गोल ४-३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hockey competition india pakistan australia