अझलन शाह हॉकी : भारताला मोठा विजय आवश्‍यक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 मार्च 2018

इपोह : अननुभवी आणि युवा भारतीय संघ अझलन शाह हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याच्या अपेक्षा बाळगून आहे. मात्र, त्यासाठी त्यांना उद्या आयर्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर अन्य सामन्यांच्या निकालावरही अवलबूंन रहावे लागेल. 

पहिल्या तीन सामन्यांनंतर भारताला चौथ्या सामन्यात विजयाचा चेहरा दिसला. मलेशियाला त्यांनी 5-1 अशा मोठ्या फरकाने हरवले. त्यापूर्वी भारताला स्पर्धेत अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत राहिला. 

ऑस्ट्रेलियाने आपले चारही सामने जिंकून यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून केवळ आयर्लंड संघालाच संधी नाही. अन्य संघाला अंतिम फेरी खेळण्याची संधी आहे. 

गुणतक्‍त्यातील दुसऱ्या स्थानावरील अर्जेंटिनाचे 7, पाठोपाठ मलेशियाचे सहा, इंग्लंडचे 5 आणि भारताचे 4 गुण झाले आहेत. चार पराभवामुळे आयर्लंड यापूर्वी स्पर्धेबाहेर गेले आहे. त्यामुळे ही संधी साधून भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवून आपले आव्हान कायम राखेल याची शक्‍यता नाकारता येत नाही. अर्थात, अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना हा विजय पुरेसा नाही. त्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. 

सामन्याचे महत्त्व लक्षात घेता भारतीय प्रशिक्षक शूअर्ड मरिने सर्व शक्‍यता पडताळून बघतील यात शंका नाही. मलेशियावरील मोठ्या विजयाने त्यांचा आत्मविश्‍वास निश्‍चित दुणावलेला असेल. मलेशियाविरुद्ध भारतीय आक्रमकांचा खेळ उल्लेखनीय ठरला होता. आयर्लंडविरुद्ध देखील आक्रमक तोच पवित्रा कायम राखतील असा विश्‍वास मरिने यांनी व्यक्त केला. 

अननुभवी खेळाडूंचे नेतृत्त्व करताना सरदार सिंगला देखील हॉकी इंडियाने जणू न कळत अखेरची संधी दिली आहे. त्यामुळे आपला सर्व अनुभव पणाला लावून सरदारला सामन्यात खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. 

भारताला अंतिम फेरीची संधी कशी 

  • आयर्लंडविरुद्ध मोठा विजय आवश्‍यक 
  • ऑस्ट्रेलियाने अर्जेंटिनावर विजय मिळविले गरजेचे 
  • मलेशिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटायला हवा 
  • उद्याच्या कार्यक्रमात भारताचा सामना दुसरा 

ऑस्ट्रेलिया वि. अर्जेंटिना (दु. 1.30)
भारत वि. आयर्लंड (द. 3.30वा.)
इंग्लंड वि. मलेशिया (सायं. 6 वा.)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news azlan shah cup 2018 India Hockey