चॅंपियन्स करंडकातून रमणदीप सिंग "आउट'

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

ब्रेडा (नेदरलॅंड्‌स) - चॅंपियन्स करंडक स्पर्धेत देन विजयासह जबरदस्त आगेकूच करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी धक्का बसला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्ट्रायकर रमणदीप सिंग उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही. 

"एमआरआय' चाचणीनंतर त्याची दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातच त्याने गुडघ्यात वेदना होत असल्याची तक्रार केली होती. चाचणीनंतर उजव्या गुडघ्याच्या मध्य भागातच त्याला फ्रॅक्‍चर असल्याचे आढळून आले आहे. 

पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने जबरदस्त सुरवात केली आहे. मात्र, आता उद्या ऑस्ट्रेलिया आणि नंतर बेल्जियम, नेदरलॅंडसविरुद्ध त्यांना रमणदीपखेरीज खेळावे लागणार आहे. त्याची उणीव भासणार हे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी मान्य केले. ते म्हणाले, ""आम्हाला त्याची उणीव जरूर भासेल. त्याच्यासारखा अनुभवी खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात हवा होता. चाल रचताना तो तयार करत असलेल्या जागा खूप निर्णायक ठरत होत्या. आता अन्य खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवून देण्याची संधी आहे.'' 

दोन विजयासह भारत गुणतक्‍त्यात आघाडीवर आहे. राऊंड रॉबिन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत पहिले दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे अंतिम फेरीच्या दृष्टिने भक्कम पाऊल टाकण्यासाठी भारताला ही लढत महत्त्वाची आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील अपयशानंतर पाचव्यांदा भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविणाऱ्या हरेंद्र सिंग यांनी खेळाडूंमध्ये निर्माण केलेला आत्मविश्‍वास खूप निर्णायक ठरत आहे. सरदारचा त्यांनी केलेला समावेश भारतासाठी आतापर्यंत फलदायी ठरला आहे. त्यामुळे युवा खेळाडूंबरोबर उद्या त्याच्याकडूनही भारताला सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramandeep Singh Out from Champions Trophy