भारताचा सलामीला निसटता विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - भारताने चौरंगी हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात विजयी सलामी देताना यजमान न्यूझीलंडचे कडवे आव्हान परतवले. सलग दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करत भारताने या लढतीत ३-२ असा विजय मिळविला. या स्पर्धेतील भारताचे प्रतिस्पर्धी असलेल्या बेल्जियमनेही जपानला याच फरकाने हरवले. 

हॅमिल्टनला सुरू झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या लढतीत पहिल्या सत्रातील एकतर्फी वर्चस्वानंतर भारताने दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडला प्रतिकाराची संधी दिली. तिसऱ्या सत्रात चार मिनिटांत दोन गोल करत भारताने आघाडी घेतली. त्यानंतर कडवा प्रतिकार केलेल्या न्यूझीलंडला बरोबरीपासून रोखल्याचे समाधान भारतास नक्कीच लाभले. ललित उपाध्यायने सातव्या मिनिटास भारताचे खाते उघडले होते, तर तिसऱ्या सत्रात हरदितसिंग आणि रूपिंदर पालसिंगने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावले. 

किवींच्या वेगवान सुरवातीस दाद न देता भारतीयांनी प्रतिहल्ला केला. ललित उपाध्यायने गोलरक्षकास दाखवलेली चपळाई सुखावणारी होती. न्यूझीलंडने त्यांचा चौथा पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. त्यानंतर भारतीय बचावाने किवींना गोलपासून रोखले, ही जमेची बाब असली तरी भारतीय प्रतिआक्रमणात कमी पडले, हे सलत होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news india win in hockey competition