भारतासमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 डिसेंबर 2017

भुवनेश्‍वर - घरच्या मैदानावर वर्ल्ड हॉकी लीग फायनल्समध्ये खेळताना भारतीय खेळाडूंना सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे आता उद्या (ता. ४) ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या जर्मनी खेळताना भारतीय संघासमोर कामगिरी उंचावण्याचे पहिले आव्हान असेल. 

बलाढ्य ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखताना दाखवलेला खेळ त्यांना दुसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दाखवता आला नाही. एका सामन्यात सर्वोत्तम कामगिरी, तर लगेच पुढच्या सामन्यात सुमार असेच गेल्या काही वर्षातील भारतीय हॉकीची व्यथा राहिली आहे. 

आशियात विजेतेपद मिळविल्यानंतर आता भारतीय संघाला जागतिक पातळीवर सिद्धता दाखवण्यासाठी एकवटून खेळ करावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखल्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, बचावातील क्षुल्लक चुकीमुळे  त्यांना इंग्लंडविरुद्ध सामना गमवावा लागला.

एक बरोबरी आणि एक पराभव अशा समीकरणानंतर भारतीय संघ ‘ब’ गटात तळाला आहे. गटात जर्मनी चार गुणांसह आघाडीवर आहे. साखळी सामने केवळ उपांत्यपूर्व फेरीतील प्रतिस्पर्धी स्पष्ट करणार असले, तरी असातत्याच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी भारताला उद्याच्या सामन्याची संधी साधावीच लागेल. युरोपियन शैलीची माहिती असणारे प्रशिक्षक जोएर्ड मरिने उद्या काय रणनिती आखतात यावर भारताचे भवितव्य अवलंबून असेल. दोन सामन्यानंतर ते खेळाडूंच्या कामगिरीवर निराश आहेत. ते म्हणाले,‘‘आम्हाला सातत्य राखण्यावर भर द्यावाच लागेल. आपला दर्जा खेळाडू आपणहून का कमी करून घेत आहेत हेच मला कळत नाही. खेळाडूंशी मी चर्चा केली आहे.’’

भारताला उद्या सर्वच आघाड्यांवर सुधारणा दाखवावी लागेल. यातही बचाव अखेरपर्यंत सतर्क राहणे महत्वाचे आहे. इंग्लंडविरुद्ध याचाच फटका बसला होता. याच चुकांची पुनरावृत्ती झाल्यास त्यांना उपांत्यपूर्व फेरीत मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. भारतीय संघ तळात राहिल्यास त्यांना उपांत्यपूर्व फेरीत ‘अ’ गटातील अव्वल संघाशी खेळावे लागेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news world hockey league competition