- अँजेलिकचे पहिलेवहिले विंबल्डन विजेतेपद
- अँजेलिकचे तिसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद
- यापूर्वी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन व अमेरिकन जेतेपद
- सेरेना विंबल्डनमध्ये सात वेळा विजेती
- 24व्या ग्रॅंड स्लॅम जेतेपदाची प्रतीक्षाही लांबली
- गेल्या सप्टेंबरमध्ये मुलगी ऑलिंपियाला जन्म दिल्यानंतर सेरेनाची चौथीच स्पर्धा
लंडन : अमेरिकेची मातब्बर टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिला मातृत्वानंतर ग्रॅंड स्लॅम विजेतेपद संपादन करण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. अशा यशाची सर्वोत्तम संधी असलेल्या विंबल्डनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिला जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने हरविले.
डावखुऱ्या केर्बरने दोन सेटमध्ये विजय मिळवीत हा बहुचर्चित सामना एकतर्फी ठरविला. तिने सेरेनाला दीर्घ रॅलीज खेळण्यास भाग पाडले. त्यात सेरेनाकडून सोपे फटके चुकले. हा सामना एक तास पाच मिनिटे चालला.
- अँजेलिकचे पहिलेवहिले विंबल्डन विजेतेपद
- अँजेलिकचे तिसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद
- यापूर्वी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन व अमेरिकन जेतेपद
- सेरेना विंबल्डनमध्ये सात वेळा विजेती
- 24व्या ग्रॅंड स्लॅम जेतेपदाची प्रतीक्षाही लांबली
- गेल्या सप्टेंबरमध्ये मुलगी ऑलिंपियाला जन्म दिल्यानंतर सेरेनाची चौथीच स्पर्धा
निकाल :
महिला एकेरी - अंतिम फेरी :
अँजेलिक केर्बर (जर्मनी 11) वि.वि. सेरेना विल्यम्स (अमेरिका 25)
6-3, 6-3