मैनेनी, श्रीराम बालाजी दुसऱ्या फेरीत 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 November 2017

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या साकेतने बोस्निायाच्या टोमीस्लाव ब्रेकिच याचा प्रतिकार तीन सेटमध्ये 6-3, 4-6, 6-2 असा परतवून लावला. बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर साकेतने पहिल्या सेटमध्ये वर्चस्व राखले.

पुणे : भारताच्या एन. श्रीराम बालाजी आणि साकेत मैनेनी यांनी एमएसएलटी आणि पीएमडीटीए आयोजित एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. 

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या साकेतने बोस्निायाच्या टोमीस्लाव ब्रेकिच याचा प्रतिकार तीन सेटमध्ये 6-3, 4-6, 6-2 असा परतवून लावला. बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर साकेतने पहिल्या सेटमध्ये वर्चस्व राखले. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये ब्रेकिचने ब्रेकची संधी साधून 4-4 अशा बरोबरीनंतर 5-4 अशी आघाडी मिळवली आणि नंतर आपली सर्व्हिस राखताना दुसरा सेट जिंकत बरोबरी साधली. ब्रेकिचला हे सातत्य निर्णायक सेटमध्ये टिकवता आले नाही.

साकेतच्या वेगवान खेळापुढे तो निष्प्रभ ठरला. साकेतने दोन वेळा त्याची सर्व्हिस ब्रेक करत तिसऱ्या सेटसह लढत जिंकली. साकेतच्या तुलनेत बालाजीने सहज विजय मिळविला. त्याने इजिप्तच्या करिम महंमद मामौनला 6-4, 6-2 असे सहज पराभूत केले. 
साकेतप्रमाणे वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या विष्णू वर्धनला पराभवाचा सामना करावा लागला. कझाकस्तानच्या नवव्या मानांकित ऍलेक्‍झांडर नेदोव्येसोवने वर्धनचे आव्हान 6-3, 4-6, 7-6 असे परतवून लावले. एकेरीच्या अन्य एका लढतीत ब्रिटनच्या जय क्‍लर्क याने स्पेनच्या मारीओ विलेल्ला मार्टीनेझ याचा 3-6, 6-4, 6-4 असा पराभव केला. 

निकाल (दुहेरी) ः पहिली फेरी ः ब्रायडन क्‍लीन (ग्रेट ब्रिटन) व मार्क पोलमन्स (ऑस्ट्रेलिया) वि.वि. पेदजा 
क्रिस्टीन (सर्बिया) व स्तुंग-ह्यु यांग (तायपे) 7-6, 6-3, सुमित नागल (भारत) व नाओकी नाकागावा (जपान) वि.वि. सिद्धांत बांठिया व जयेश पुंगलिया (भारत) 7-5, 6-0 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATP tennis tournament in Pune