esakal | सानिया-डॉडीग जोडीचा अंतिम फेरीत पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

Sania Mirza & Ivan Dodig

सानियाने मिश्र दुहेरीत तीन विजेतीपदे मिळविली आहे. यापूर्वी 2014च्या अमेरिकन स्पर्धेत ब्राझीलच्या ब्रुनो सॉरेज याच्या साथीत ती जिंकली होती. गेल्या वर्षी सानियाने फ्रेंच ओपनमध्ये डॉडीगच्या साथीतच अंतिम फेरी गाठली होती, पण लिअँडर पेस-मार्टिना हिंगीस यांच्याकडून ते हरले होते.

सानिया-डॉडीग जोडीचा अंतिम फेरीत पराभव

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेलबर्न - भारताच्या सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डॉडीग यांना ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सानियाचे कारकिर्दीतील सातवे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले.

सानिया-डॉडीग या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूर-सॅम ग्रॉथ यांच्यावर 6-4, 2-6, 10-5 अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती. आज (रविवार) झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत अबीगैल स्पीअर्स (अमेरिका)- जुआन सेबॅस्टियन कॅबाल (कोलंबिया) या जोडीने सुरवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले. सानिया-डॉडीग यांना सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. पहिला सेट 6-2 असा सहज गमाविल्यानंतर, दुसऱ्या सेटमध्ये 4-4 अशी बरोबरी झाली होती. पण, स्पीअर्स आणि कॅबाल यांनी सर्व्हिस ब्रेक करत सेटही आपल्या नावावर केला. 

दुसरे मानांकन असलेल्या सानिया-डॉडीग यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर, अबीगैल किंवा कॅबाल यांना पहिल्यांदा ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळाले. या दोघांपैकी एकानेही अद्याप मिश्र दुहेरीत ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविलेले नव्हते. सानियाला कारकिर्दीतील सातवे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविण्याची संधी होती, पण तिने ती गमाविली. 