कॅरोलीन वॉझ्नियाकीला विजेतेपद

वृत्तसंस्था
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

टोकिया - जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित कॅरोलीन वॉझ्नियाकी हिने जपान ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

तिने वाइल्ड प्रवेश मिळवून आगेकूच करणाऱ्या जपानच्या युवा नाओमी ओसाका हिचे आव्हान 7-5, 6-3 असे मोडून काढले. पहिल्या सेटमध्ये दुसऱ्याच गेमला वॉझ्नियाकीने सर्व्हिस गमावली होती. मांडीच्या दुखापतीवर उपचारासाठी तिने काही वेळदेखील घेतला. त्यानंतर मात्र तिने मागे वळून बघितले नाही.

कारकिर्दीतले तिने 24वे विजेतेपद मिळविले. दुखापतीमुळे गेल्या मोसमात वॉझ्नियाकी क्रमवारीत 74व्या स्थानापर्यंत घसरली होती. मात्र, अमेरिकन स्पर्धेतील उपांत्य फेरीतील धडक आणि आता विजेतेपद यामुळे तिचे मानांकन सुधारण्यास मदत होईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caroline Woziniaki wins Japan Open Tennis