मास्टर्स टेनिस स्पर्धेत फेडरर उपांत्य फेरीत

पीटीआय
गुरुवार, 30 मार्च 2017

मायामी, फ्लोरिडा - रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल यांनी मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. फेडररने स्पेनच्या रॉबर्टो बॉटिस्टा आगुटचे कडवे आव्हान ७-६ (७-५), ७-६ (७-४) असे मोडून काढले. त्याने तिसऱ्या मॅचपॉइंटवर विजय मिळविला.

नदालने फ्रान्सच्या निकोलस माहूतवर ६-४, ७-६ (७-४) अशी मात केली. नदालची अमेरिकेच्या जॅक सॉक याच्याशी लढत होईल. स्टॅन वॉव्रींकाचे आव्हान मात्र संपुष्टात आले. जर्मनीच्या अलेक्‍झांडर झ्वेरेवने त्याला ४-६, ६-२, ६-१ असा धक्का दिला. अलेक्‍झांडरला १६वे मानांकन आहे. रॉबर्टोने फेडररला शर्थीची झुंज दिली. त्याने बेसलाइनवरून जोरदार खेळ केला. फेडररने आधीच्या पाचही सामन्यांत रॉबर्टोवर मात केली होती. त्याला अनुभव पणास लावावा लागला. फेडररसमोर दहाव्या मानांकित चेक प्रजासत्ताकाच्या टोमास बर्डीच याचे आव्हान असेल. वॉव्रींकाचा पराभव धक्कादायक ठरला. जॉन इस्नरविरुद्ध त्याला तीन मॅचपॉइंट वाचवावे लागले होते. १९ वर्षांच्या अलेक्‍झांडरविरुद्ध मात्र त्याला अशी संधी मिळाली नाही. दुसऱ्या सेटमध्ये दोन वेळा; तर तिसऱ्या सेटमध्ये त्याने तीन वेळा सर्व्हिस गमावली. द्वितीय मानांकित जपानच्या केई निशीकोरीने आगेकूच कायम राखली. त्याने अर्जेंटिनाच्या फेडेरिको डेल्बोनीसचा ६-३, ४-६, ६-३ असा पराभव केला. निशीकोरीची इटलीच्या फॅबिओ फॉग्नीनीशी लढत होईल.

Web Title: Federer Masters tennis tournament semi-finals