पुण्याची गार्गी पवार विजेती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 November 2016

पुणे  औरंगाबाद येथे झालेल्या एन्ड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर (इएमएमटीसी) आयोजित एमएसएलटीए-योनेक्‍स सनराइज चौदा वर्षांखालील गटाच्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात दिल्लीच्या दिवेश गेहलोत, तर मुलींच्या गटात पुण्याच्या गार्गी पवारने विजेतेपद संपादिले.  

विभागीय क्रीडा संकुलाच्या इएमएमटीसी टेनिस कोर्टवर शनिवारी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुलींच्या गटात तिसऱ्या मानांकित व महाराष्ट्राच्या (पुणे) गार्गी पवारने आपलीच सहकारी असलेल्या चौथ्या मानांकित पुण्याच्या मलिका मराठेचा ६-२, ६-१ असा सरळ पराभव करून विजेतेपद पटकावले. सुमारे एक तासापर्यंत चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी सुरेख खेळ केला. पहिल्या सेटमध्ये गार्गी पवारने सातव्या गेममध्ये मलिका मराठेची सर्व्हिस रोखताना स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ६-२ असा जिंकून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र गार्गी पवारने वर्चस्व राखत हा सेट ६-१ असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. गार्गी पवार सह्याद्री इंटरनॅशनल प्रशालेत सातवी इयत्तेत शिकत असून, ती पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब टेनिस कोर्टवर हेंमत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gargi Pawar win under fourteen years national tennis tournament