esakal | वॉझ्नियाकीची विजयी सलामी
sakal

बोलून बातमी शोधा

वॉझ्नियाकीची विजयी सलामी

वॉझ्नियाकीची विजयी सलामी

sakal_logo
By
पीटीआय

दुबई - दोहा टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी खेळल्यानंतर दोन दिवसांतच कॅरोलिन वॉझ्नियाकी हिने सोमवारी दुबई टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीत तिने दारया कॅसाटकिना हिचा ६-२, ७-५ असा पराभव केला. ऑलिंपिक चॅंपियन मोनिका पुईग हिने पाठीचे दुखणे विसरून यारोस्लावा श्‍वेडोवा हिचा ६-३, ४-६, ६-४ असा पराभव केला. एंजलेकि किर्बर हिला पहिल्या फेरीत ‘बाय’ असल्यामुळे ती मंगळवारी दुसऱ्या फेरीत पहिली लढत खेळेल.