नदाल-जोकोविच लढतीचा आज लागणार निकाल

वृत्तसंस्था
Saturday, 14 July 2018

सामना सुरु झाल्यानंतर दोघांनीही दमदार खेळ करत एकमेकांच्या प्रत्येक शॉर्टला प्रत्युत्तर दिले. मात्र 11 वाजता तीन सेट नंतर खेळ थांबण्यात आला आणि प्रेक्षकांची उत्कंठा ताणण्यात आली. 

इंग्लंड : विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी (13 जुलै)  क्रिडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटेल एवढे अतितटीचे सामने बघायला मिळाले. केविन अॅंडरसन आणि जॉन इस्नर यांच्या तब्बल सहा तास चालेल्या सामन्याचा प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद घेतला. त्यानंतर नोव्हाक जोकोविच आणि रॅफेल नदाल या दोन दिग्गजांमध्ये होणाऱ्या सामन्याकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. सामना सुरु झाल्यानंतर दोघांनीही दमदार खेळ करत एकमेकांच्या प्रत्येक शॉर्टला प्रत्युत्तर दिले. मात्र 11 वाजता तीन सेट नंतर खेळ थांबण्यात आला आणि प्रेक्षकांची उत्कंठा ताणण्यात आली. 

विम्बल्डनच्या नियमानुसार रात्री 11 वाजता सगळे खेळ थांबण्यात येतात. ऑल इंग्लंड क्लबच्या मैदानावर अॅंडरसन आणि इस्नर यांच्यात साडेसहा तास चाललेल्या सामन्यामुळे रात्री आठ वाजून गेले तरी नदाल आणि जोकोविच यांच्यातील सामना सुरु करता आला नाही. 

नदाल आणि जोकोविच यांनी शुक्रवारी तीन सेटचा खेळ केला ज्यामध्ये जोकोविचने पहिला आणि तिसरा सेट 6-7,7-6 गुणांनी जिंकत सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दोन तास 54 मिनिटांनंतर 11 वाजता थांबवण्यात आलेला सामना आज (शनिवार) स्थानिक वेळेनुसार एक वाजता सुरु होईल. नदाल आणि जोकोविच यांच्यातील सामन्यानंतर सेरेना आणि केर्बर यांच्यातील महिला एकेरीचा अंतिम सामना खेळविण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nadal vs Djokovic match suspended