लंडन : सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने झुंजार लढवय्याप्रमाणे खेळ करण्यात पुन्हा एकदा यश मिळविले. यामुळे तो एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेची उपांत्य फेरी गाठू शकला. त्याने कॅनडाच्या मिलॉस राओनीच याचा प्रतिकार 7-6 (8-6), 7-6 (7-5) असा मोडून काढला.
वैयक्तिक जीवनातील समस्यांमुळे जोकोविचला अव्वल स्थान गमवावे लागले आहे. मिलॉसने त्याच्याविरुद्ध जोरदार खेळ केला; पण जोकोविचने लढाऊ बाणा प्रदर्शित केला. दोन तास 14 मिनिटे चाललेल्या लढतीत त्याने 14 "एसेस'च्या जोडीला 42 "विनर्स' मारले. मोसमाची सांगता करणारी स्पर्धा जोकोविच सलग पाचव्यांदा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मिलॉसकडून मोक्याच्या क्षणी चूक झाली. पहिल्या सेटच्या टायब्रेकमध्ये "सेटपॉइंट'ला त्याच्याकडून "डबल फॉल्ट' झाली. दुसऱ्या सेटच्या टायब्रेकमध्ये मात्र जोकोविचने 4-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर मिलॉसचा एक फोरहॅंड चुकला. 5-5 अशा बरोबरीस जोकोविचने बिनतोड सर्व्हिस केली. त्यानंतर मिलॉसचा बॅकहॅंड चुकला. कारकिर्दीत सलग आठव्या लढतीत तो जोकोविचकडून हरला.
जोकोविचने गटात दोन विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की केला आहे. अखेरच्या गटसाखळी सामन्यात त्याच्यासमोर फ्रान्सच्या गेल मॉंफिसचे आव्हान असेल. हा सामना जिंकल्यास त्याला 200 गुण मिळतील. त्यामुळे अँडी मरे याच्याविरुद्धची पिछाडी कमी करण्याची त्याला संधी असेल. साहजिकच तो विजयासाठी आतूर असेल. मिलॉसला या पराभवानंतरही संधी असेल. त्याची डॉमनिक थिएमशी लढत होईल. त्यात मिलॉसला विजय अनिवार्य असेल. थिएमने मॉंफिसवर 6-3, 1-6, 6-4 अशी मात केली आहे. त्यामुळे मिलॉस आणि थिएम यांचा प्रत्येकी एक विजय झाला आहे. थिएमसाठी ही कामगिरी ऐतिहासिक ठरली. या स्पर्धेत यापूर्वी ऑस्ट्रियाच्या थॉमस मस्टरने 1996 मध्ये विजय मिळविला होता. त्यानंतर अशी कामगिरी करणारा थिएम ऑस्ट्रियाचा पहिलाच खेळाडू ठरला.
मी मनोधैर्य भक्कम राखले. मी संघर्ष करत राहिलो. संधी मिळेल अशा विश्वासाने मी झुंज दिली. सामन्याचा निकाल काहीही लागू शकला असता, कारण मिलॉस हा भक्कम खेळ करणारा खेळाडू असून, तो ताकदवान फटके मारू शकतो. झंझावाती सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूविरुद्ध दोन टायब्रेकमध्ये जिंकणे मोठी गोष्ट आहे.
- नोव्हाक जोकोविच, सर्बियाचा टेनिसपटू