माझ्यावरील दडपण आता जोकोविच, सेरेनासारखे

वृत्तसंस्था
Wednesday, 21 December 2016

मुंबई - सलग 85 आठवडे जागतिक क्रमवारीत राहिल्यावर त्याचे दडपण येते. आता माझी अवस्था नोव्हाक जोकोविच, सेरेना विल्यम्ससारखी झाली आहे. अंतिम फेरीत जरी पराजित झाली, तरी ते अपयश समजले जाते, असे सानिया मिर्झाने सांगितले.

मुंबई - सलग 85 आठवडे जागतिक क्रमवारीत राहिल्यावर त्याचे दडपण येते. आता माझी अवस्था नोव्हाक जोकोविच, सेरेना विल्यम्ससारखी झाली आहे. अंतिम फेरीत जरी पराजित झाली, तरी ते अपयश समजले जाते, असे सानिया मिर्झाने सांगितले.

सरते वर्ष विसरू शकणार नाही. त्यात आठ विजेतीपदे जिंकली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी राहिले हे सुखावह आहे. अर्थातच नव्या वर्षात जास्त खडतर आव्हान असेल. प्रत्येकाचे कामगिरीवर लक्ष असणार. स्पर्धा जिंकली नाही, तर ते अपयश असते. याचाच अनुभव नोवाक जोकोविक, सेरेना विल्यम्स घेत आहेत. मात्र सतत यशाची अपेक्षा बाळगली गेल्यास त्यात चुकीचे नाही. जगात अव्वल असल्यास हे घडणारच, असे सानियाने सांगितले.

नव्या वर्षात फ्रेंच महिला दुहेरी तसेच विंबल्डन मिश्र दुहेरी जिंकण्याचे जास्त लक्ष्य असेल. प्रत्येक ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकली तर जास्तच आनंद होईल, असे सांगतानाच नवी सहकारी बार्बरा लढवय्यी आहे. ती कधीही थकत नाही. तिच्या साथीत खेळण्याचा फायदाच होईल.

मार्टिना हिंगीसबरोबर खेळल्याचा मला खूप फायदा झाला. तिच्याकडून मी खूप काही शिकले. तिचा अनुभव मोलाचा होता. आता जोडी तुटल्याचे नक्कीच दुःख होते. सहकाऱ्याबरोबर सूर जुळलेला असतो. मात्र सुदैवाने मला बार्बरासारखी सहकारी लाभली. व्यावसायिक स्पर्धा असल्यामुळे जिंकल्यावरच सूर जुळण्यास मदत होते, हेही लक्षात घ्यायला हवे, असे तिने सांगितले.

गतवर्षी 12 एप्रिलला (लग्नाच्या वाढदिवशी) मी दोन वर्षे जागतिक क्रमवारीत अव्वल राहणार आहे, असे कोणी मला सांगितले असते, तर मला हसू आवरले नसते. टेनिस नव्हे, तर प्रत्येक खेळातच कडवी स्पर्धा असते. हे सर्वोच्च स्थान राखणे सोपे नसते. तिथे असल्यावर राखण्याचे दडपण जास्त असते. प्रत्येकालाच ते खुणावत असते.
- सानिया मिर्झा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pressure for me now, like Djokovic, Serena