esakal | सलग दुसऱ्या विजयासह फेडरर उपांत्य फेरीत 
sakal

बोलून बातमी शोधा

Roger Federer

पहिल्या सेटपासून दोन्ही खेळाडूंनी अचूक सर्व्हिसचा खेळ केला. त्यामुळे अखेरपर्यंत एकालाही ब्रेकची संधी साधता आली नाही. अर्थात, 12व्या गेमला झ्वेरेवने दोन सेटपॉइंट वाचवून सेट टायब्रेकमध्ये नेला. टायब्रेकमध्ये झ्वेरेव 4-0 असा आघाडीवर होता. त्यानंतर झ्वेरेवेने 6-4 असा सेट पॉइंट मिळविला.

सलग दुसऱ्या विजयासह फेडरर उपांत्य फेरीत 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : अनुभवी रॉजर फेडररने युवा आव्हानवीर ऍलेक्‍झांडर झ्वेरेव याचे आव्हान तीन सेटमध्ये परतवून लावत एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
झ्वेरेवकडून अनुभवाला आव्हान मिळणे अपेक्षित होते. पण, तो अनुभवावर मात करू शकला नाही. फेडररने 7-6(8-6), 5-7, 6-1 असा विजय मिळविला. 

पहिल्या सेटपासून दोन्ही खेळाडूंनी अचूक सर्व्हिसचा खेळ केला. त्यामुळे अखेरपर्यंत एकालाही ब्रेकची संधी साधता आली नाही. अर्थात, 12व्या गेमला झ्वेरेवने दोन सेटपॉइंट वाचवून सेट टायब्रेकमध्ये नेला. टायब्रेकमध्ये झ्वेरेव 4-0 असा आघाडीवर होता. त्यानंतर झ्वेरेवेने 6-4 असा सेट पॉइंट मिळविला. पण, त्याला ती संधी साधता आली नाही. फेडररने तिसऱ्या सेट पॉइंट मिळवून सेट जिंकला. दुसऱ्या सेटला सुरवातीलाच झ्वेरेवची सर्व्हिस भेदून फेडररने भक्कम सुरवात केली. पण, चौथ्या गेमला झ्वेरेवने प्रतिआक्रमण करत फेडररची सर्व्हिस भेदून बरोबरी साधली. दुसऱ्या सेटला फेडररला सर्व्हिसने दगा दिला आणि बाराव्या गेमला त्याला सर्व्हिस आणि सेट गमवावा लागला. निर्णायक सेटमध्ये मात्र फेडररने झ्वेरेवला संधीच दिली नाही. झ्वेरेवला या सेटमध्ये केवळ एक गेम जिंकता आली. 

त्यापूर्वी जॅक सॉकने आपले आव्हान कायम राखले. त्याने विंबल्डनच्या उपविजेत्या मरिन चिलीच याचा 5-7, 6-2, 7-6(7-4) असा पराभव केला.