विजेतेपदासह फेडररने साजरे केले अव्वल स्थान 

वृत्तसंस्था
Monday, 18 June 2018

स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने स्टुटगार्ट ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठून जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल मानांकन मिळविले होते. हे अव्वल मानांकन नंतर त्याने विजेतेपद मिळवून साजरे केले. 
 

स्टुटगार्ट - स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने स्टुटगार्ट ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठून जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल मानांकन मिळविले होते. हे अव्वल मानांकन नंतर त्याने विजेतेपद मिळवून साजरे केले. 

स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्याने कॅनडाच्या मिलोस राओनिच याचा 6-4, 7-6(7-3) असा पराभव केला. फेडररने कारकिर्दीत या स्पर्धेत प्रथमच विजेतेद मिळविले. त्याने 78 मिनिटांत सामना जिंकला. या विजेतेपदामुळे आता विंबल्डन विजेतेपद राखण्याच्या त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

त्याचबरोबर, त्याने वर्षभरात ग्रास कोर्टवर अपराजित राहण्याचा पराक्रम केला. त्याने सलग 16 विजय मिळविले. आजच्या अंतिम लढतीत पहिला सेट सहज जिंकल्यानंतरही दुसऱ्या सेटमध्ये त्याला ब्रेकची संधी साधता आली नाही. दोघांपैकी कुणीच ब्रेकची संधी साधू शकले नाही. टायब्रेकमध्ये मात्र, राओनिचकडून झालेला "डबल फॉल्ट' फेडररच्या पथ्यावर पडला आणि त्याने 11 आठवड्यानंतर पहिले विजेतेपद मिळविले. आता हॅले आणि नंतर विबंल्डन टेनिस स्पर्धेत त्याने विजेतेपद मिळविल्यास कारकिर्दीत तो विजेतेपदाचे शतक गाठू शकेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roger Federer top winner