सेरेना विल्यम्सची माघार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

न्यूयॉर्क - अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने इंडियन वेल्स आणि मायामी या दोन स्पर्धांतून माघार घेतली आहे. गुडघ्याच्या दुखापतीचे कारण तिने दिले आहे. इंडियन वेल्सची स्पर्धा तिने दोन, तर मायामीची आठ वेळा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून विक्रमी 23वे विजेतेपद मिळविल्यापासून सेरेना खेळलेली नाही. ती म्हणाली की, "गुडघे दुखीमुळे मला सराव करता आलेला नाही. या स्पर्धांत खेळू शकणार नाही म्हणून मी निराश झाले आहे. मी लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन खेळण्यासाठी आणि पुढील वाटचाल करण्यासाठी उत्सुक आहे.' सेरेनाच्या माघारीमुळे 20 मार्चच्या आठवड्यात जर्मनीची अँजेलिक केर्बर जागतिक क्रमवारीत अव्वल बनेल. हे स्थान राखण्यासाठी सेरेनाला इंडियन वेल्स स्पर्धेत किमान उपांत्य फेरी गाठण्याची गरज होती.
Web Title: serena williams return