esakal | सेरेना विल्यम्स उपांत्य फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

Serena Williams into Semi Final of Wimbledon

सेरेना विल्यम्स उपांत्य फेरीत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : मातृत्वानंतर ग्रॅंड स्लॅम यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विंबल्डनच्या महिला एकेरीत उपांत्य फेरी गाठली. तिच्यासह अँजेलिक केर्बर, जेलेना ऑस्टापेन्को आणि ज्युलिया जॉर्जेस यांनीही आगेकूच केली. 

सेरेनाने इटलीच्या कॅमिला जॉर्जीचे आव्हान 3-6, 6-3, 6-4 असे परतावून लावले. तिच्यासमोर 13व्या मानांकित जर्मनीच्या ज्युलियाचे आव्हान असेल. ज्युलियाने 20व्या मानांकित नेदरलॅंड्‌सच्या किकी बर्टेन्स हिची घोडदौड 3-6, 7-5, 6-1 अशी खंडित केली. 

दुसरा उपांत्य सामना अँजेलिक आणि जेलेना यांच्यात होईल. 11वे मानांकन असलेल्या अँजेलिकने 14व्या मानांकित रशियाच्या डॅरिया कॅसाट्‌कीनाला 6-3, 7-5 असे हरविले. जेलेनाने स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिब्यूल्कोवावर 7-5, 6-4 अशी मात केली.