अग्रमानांकित अँजेलिकवर मुगुरुझाची मात

पीटीआय
Tuesday, 11 July 2017

लंडन - अग्रमानांकित अँजेलिक केर्बरचे विंबल्डनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. गतवर्षीच्या फ्रेंच विजेत्या गार्बीन मुगुरुझाने चौथ्या फेरीत तिला ४-६, ६-४, ६-४ असे पराभूत केले. या पराभवामुळे अँजेलिकला अव्वल स्थानावरून पायउतार व्हावे लागेल.

चौदावे मानांकन असलेल्या मुगुरुझाने एका सेटच्या पिछाडीवरून झुंजार खेळ केला. हा सामना दोन तास १८ मिनिटे चालला. मुगुरुझाने ५५ विनर्स मारले, तर अँजेलिकला केवळ २७ विनर्स मारता आले. निर्णायक सेटमध्ये सुरवातीला ब्रेक मिळवूनही अँजेलिकला फायदा उठविता आला नाही.

अँजेलिकला गेल्या वर्षी सेरेना विल्यम्सकडून पराभूत व्हावे लागले होते. तिला यावर्षी पहिल्या तीन पैकी एकाही ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठता आलेली नाही.

महिला एकेरीत या स्पर्धेनंतर नवी अव्वल खेळाडू उदयास येईल. रुमानियाच्या सिमोना हालेपला उपांत्य फेरी गाठल्यास हा मान मिळेल. तिला तेवढी आगेकूच करता आली नाही, तर कॅरोलिना प्लिस्कोवाची या शर्यतीत सरशी होईल.

यंदाच्या फ्रेंच विजेत्या जेलेना ऑस्टापेन्कोने येथे प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाला ६-३, ७-६ (८-६) असे हरविले. एलिनाला चौथे मानांकन होते. एकवेळ तिला विजयाची संधी होती. जेलेनाला आठ मॅचपॉइंट लागले.

व्हीनस विल्यम्सनेही आगेकूच केली. तिने २७व्या मानांकित ॲना काँजुहचा ६-३, ६-२ असा पराभव केला. रशियाच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोवाने पोलंडच्या ॲग्नीस्का रॅडवन्स्काचे आव्हान ६-२, ६-४ असे परतावून लावले. सातवे मानांकन असलेल्या स्वेतलानाने दहा वर्षांत प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. ॲग्नीस्काला नववे मानांकन होते.

महिला एकेरीत मॅग्डलेना रिबॅरीकोवाची कामगिरी चर्चेचा विषय ठरली. ग्रास कोर्टवरील तरबेज खेळाडू असूनही तिला विंबल्डनमध्ये प्रभाव पाडता आला नव्हता. या वेळी तिने पेट्रा मार्टिचवर ६-४, २-६, ६-३ असा विजय संपादन केला. कारकिर्दीत प्रथमच तिने विंबल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. क्रोएशियाच्या पेट्राने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. मॅग्डलेना क्रमवारीत ८७वी  आहे.

बांठिया पराभूत
पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या भारताच्या सिद्धांत बांठियाचा पहिल्या फेरीत पराभव झाला. फ्रान्सच्या मॅट्टीओ मार्टिनेयू याने त्याला ३-६, ६-२, ७-५ असे हरविले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Angelique Mughuruza