पुण्यात नववर्षात एटीपी टेनिस स्पर्धा

पुण्यात नववर्षात एटीपी टेनिस स्पर्धा

‘महाराष्ट्र ओपन’च्या संयोजनासाठी पाच वर्षांचा करार

पुणे - भारतामधील एकमेव एटीपी टेनिस स्पर्धा आता पुण्यात होईल. नववर्षात महाराष्ट्र ओपन नावाने स्पर्धेचे आयोजन होईल. सुमारे दोन दशके या स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर चेन्नईने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद गमावले.

या स्पर्धेला आर्थिक पाठिंबा देण्याचा सरकारी अध्यादेश राज्य सरकारने शनिवारीच घेतला होता. त्यानंतर कराराची औपचारिकता पूर्ण झाली. स्पर्धेचे हक्क असलेल्या आयएमजी-रिलायन्सने (आयएमजीआर) पाच वर्षांसाठी महाराष्ट्र सरकार आणि एमएसएलटीए (महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना) यांच्याशी करार केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात एटीपी स्पर्धेचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. महाराष्ट्र ओपनला आम्ही नवी उंची प्राप्त करून देऊ. दर वर्षी या स्पर्धेत नामवंत स्पर्धकांचा सहभाग राहील याची खात्री वाटते.

आयएमजी-रिलायन्सच्या प्रवक्‍त्याने सांगितले की, तमिळनाडू सरकार, तेथील संघटना आणि प्रामुख्याने चाहत्यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांच्यामुळे चेन्नई ओपनला भव्य यश मिळाले. आता पुण्यासह महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील चाहते स्पर्धेवर असे प्रेम करतील अशी अपेक्षा आहे. आम्ही टेनिसची एक परंपरा निर्माण केली आहे, तसेच नवोदित खेळाडूंसाठी संधीचे दालन निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळण्याची तसेच जागतिक क्रमवारीत बहुमोल गुण कमावण्याची संधी मिळेल.

चेन्नईची पीछेहाट का?
यंदा चेन्नईतील नुगम्बाक्कम येथील स्टेडियमवर स्पर्धा पार पडली. त्यानंतर मुख्य पुरस्कर्ते असलेल्या एअरसेलने माघार घेतली. मुख्य पुरस्कर्ते आपण मिळवावेत, आम्ही तमिळनाडू सरकार आणि स्थानिक प्रायोजकांच्या मदतीने आयोजन सुरू ठेवू असे तमिळनाडू संघटनेने ‘आयएमजीआर’ला कळविले होते. ‘आयएमजीआर’ने नवे सक्षम संयोजक मिळाल्यामुळे तमिळनाडू संघटनेबरोबरील उरलेला दोन वर्षांचा करार रद्द केला.

चेन्नई ओपन
१९९६ ते २०१६ दरम्यान २१ वर्षे आयोजन
२००७ मध्ये स्पेनच्या रॅफेल नदालचा सहभाग
स्पेनचा माजी फ्रेंच विजेता कार्लोस मोया दोन वेळचा विजेता
स्वित्झर्लंडचा स्टॅन वॉव्रींका हॅट्‌ट्रिकसह चार वेळा विजेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com