बेलिंडा बेन्चीचची व्हीनसवर मात

बेलिंडा बेन्चीचची व्हीनसवर मात

मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत गतउपविजेती व्हीनस विल्यम्स आणि माजी ग्रॅंड स्लॅम उपविजेता केव्हिन अँडरसन यांचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले. स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्चीचने व्हीनसला, तर ब्रिटनच्या काईल एडमंडने अँडरसनला हरविले.

बेंलिंडाने ६-३, ७-५ असा दोन सेटमध्ये विजय मिळविला. बेलिंडाने तिच्याविरुद्ध आत्मविश्‍वासाने खेळ केला. चार लढतींत व्हिनसला तिने प्रथमच हरविले.

एडमंडचा धक्का
पुरुष एकेरीत अँडी मरेच्या अनुपस्थितीत मुख्य ड्रॉमध्ये ब्रिटनचा एकमेव खेळाडू म्हणून एडमंडचा सहभाग आहे. त्याने ११व्या मानांकित अँडरसनला ६-७ (४-७), ६-३, ३-६, ६-३, ६-४ असे हरवून कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय नोंदविला. एडमंड ४९व्या क्रमांकावर आहे. निर्णायक सेटमध्ये ०-२ अशा पिछाडीवरून त्याने जिद्दीने खेळ केला. हा सामना तीन तास ५९ मिनिटे चालला. एडमंडने यापूर्वी २०१६च्या अमेरिकन स्पर्धेत १५व्या मानांकित रिचर्ड गास्केला हरविले होते. 

रॅफेल नदालने डॉमिनीकन प्रजासत्ताकाच्या व्हिक्‍टर एस्ट्रेला बरगॉसविरुद्ध केवळ तीन गेम गमावताना ६-१, ६-१, ६-१ असा विजय मिळविला. बरगॉस ७९व्या स्थानावर आहे.

कॅनडाच्या १८ वर्षीय डेनिस शापोवालोव याने ग्रीसच्या नवोदित स्टीफॅनोस त्सित्सीपासला ६-१, ६-३, ७-६ (७-५) असे हरविले. शापोवालोवने २०१६ मध्ये विंबल्डन ज्युनीयर जेतेपद मिळविले. तेव्हापासून त्याची प्रतिभासंपन्न खेळाडूंमध्ये गणना होत आहे.

स्लोआनी पराभूत
अमेरिकन विजेत्या स्लोआनी स्टीफन्सला चीनच्या झॅंग शुआई हिने २-६, ७-६ (७-२), ६-२ असे हरविले. स्लोआनीला अमेरिकन जेतेपद जिंकल्यापासून सलग सातवा सामना गमवावा लागला. मागील वर्षी अमेरिकन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेल्या अमेरिकेच्याच कोको वॅंडेवेघे हिचेही आव्हान संपुष्टात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com