युकी भांब्री मुख्य फेरीत

पीटीआय
Monday, 15 January 2018

मेलबर्न - सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताच्या युकी भांब्रीने पात्रता फेरीतून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. त्याने रविवारी पात्रतेच्या निर्णायक फेरीत कॅनडाच्या पीटर पोलन्सकीचा पहिला सेट गमाविल्यानंतर १-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. ही लढत १ तास ५५ मिनिटे चालली. 

मुख्य फेरीत आता त्याची गाठ सायप्रसच्या मार्कोस बघडाटीस याच्याशी पडणार आहे. बघडाटीस याने २००६ मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. युकी तिसऱ्यांदा या मुख्य फेरीत पात्र ठरला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये अँडी मरे आणि २०१६ मध्ये टोमास बर्डीचविरुद्ध त्याला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. भारताचा दुसरा खेळाडू रामकुमार रामनाथन मात्र मुख्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला. त्याला कॅनडाच्या वासेक पोस्पीसिलकडून ४-६, ६-४, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. युकीने कुमार गटात अव्वल मानांकन भूषवले असून, २००९ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत कुमार गटाचे विजेतेपद मिळविले होते. व्यावसायिक टेनिसपटू झाल्यापासून युकी केवळ याच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळू शकला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news australian open Yuki Bhambri tennis