esakal | अर्जेंटिना जागतिक गटातून बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

अर्जेंटिना जागतिक गटातून बाहेर

अर्जेंटिना जागतिक गटातून बाहेर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अस्तना (कझाकस्तान) - डेव्हिस करंडक स्पर्धेतील गतविजेते अर्जेंटिनाला १५ वर्षांनी जागतिक गटातून बाहेर पडावे लागले आहे. त्यांना कझाकस्तानकडून ३-२ असा पराभव पत्करावा लागला. 

परतीच्या एकेरीच्या लढतीत मिखाईल कुकुशकिन याने अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वार्टझमन याचा पराभव करून कझाकस्तानच्या विजयावर जणू शिक्कामोर्तब केले. मात्र, त्यांना अखेरची लढत गमवावी लागली. गतविजेते असताना जागतिक गटातून बाहेर पडणारा अर्जेंटिना तिसरा संघ ठरला. यापूर्वी १९९७ मध्ये फ्रान्स आणि १९९९ मध्ये स्वीडनवर अशी वेळ आली होती. दरम्यान, फ्रान्सने सर्बियावर विजय मिळवून यंदाच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. नोव्हाक जोकोविच, यान्को टिप्सारेविच आणि व्हिक्‍टर ट्राईचकीच्या गैरहजेरीचा चांगलाच फटका सर्बियाला बसला. विजेतेपदासाठी आता त्यांची गाठ बेल्जियमशी पडेल. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभव केला. परतीच्या एकेरीच्या लढतीत स्टीव्ह ड्रासिस याने जॉर्डन थॉम्प्सन, तर डेव्हिड गॉफिनने निर्णायक लढतीत निक किर्गिओसचा पराभव केला.