ऋतुजाची दोन्ही गटांत आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 September 2017

हुआ हीन (थायलंड) - भारताच्या ऋतुजा भोसलेने आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या दोन्ही गटांत आगेकूच केली. एकेरीत तिने चीनच्या मी झौमा यू हिला ६-२, ६-१ असे हरवून उपांत्य फेरी गाठली. ऋतुजा ७३८व्या, तर यू ९९५व्या क्रमांकावर आहे. 

एकेरीत आव्हान कायम असलेली ऋतुजा ही एकमेव भारतीय आहे. दुहेरीत ऑस्ट्रेलियाची अलेक्‍झांड्रा वॉल्टर्स व ऋतुजा यांनी अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी एम्मा हर्स्ट (ब्रिटन)-एलानी जेनोवेसे (माल्टा) यांना ३-६, ६-२, १०-४ असे हरविले. हा सामना एक तास २२ मिनिटे चालला. ऋतुजा-अलेक्‍झांड्रा यांना दुसरे मानांकन असून त्यांच्यासमोर भारताच्या झील देसाई-प्रांजला याडलापल्ली यांचे आव्हान असेल. त्यांनी चीनच्या सिकी काओ-यिझुआन ली यांना ६-२, ६-४ असे हरविले. पुढील आठवड्यात ऋतुजा प्रांजलासह खेळणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news ITF tennis competition