esakal | आयटीएफ स्पर्धेत ऋतुजाला एकेरीत विजेतेपद

बोलून बातमी शोधा

आयटीएफ स्पर्धेत ऋतुजाला एकेरीत विजेतेपद
आयटीएफ स्पर्धेत ऋतुजाला एकेरीत विजेतेपद
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हुआ हिन (थायलंड) - भारताच्या ऋतुजा भोसले हिने आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या एकेरीत विजेतेपद मिळविले. तिने अंतिम फेरीत तैवानच्या हुआ-चेन ली हिला ६-४, २-६, ७-५ असे हरविले. ऋतुजा जागतिक क्रमवारीत ७३८वी, तर ली ७०८वी आहे. दोन तास २४ मिनिटे सामना रंगला. ऋतुजाने सांगितले, की मनगटाच्या दुखापतीमुळे मी निराश झाले होते; पण या स्पर्धेत यशस्वी पुनरागमन झाल्यामुळे आनंद वाटतो. ऋतुजाने एक लाख पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जिंकले, तसेच १८ गुणांची कमाई केली. यामुळे ती क्रमवारीत सातशेच्या आसपास प्रगती करेल. तिचे हे एकेरीतील दुसरे आयटीएफ विजेतेपद आहे. या लढतीनंतर तिला दुहेरीचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाच्या अलेक्‍झांड्रा वॉल्टर्स हिच्यासह खेळावा लागला. त्यांना झील देसाई-प्रांजला याडलापल्ली यांनी ६-२, ७-५ असे हरविले.