esakal | रॉजर फेडरर अंतिम फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

रॉजर फेडरर अंतिम फेरीत

रॉजर फेडरर अंतिम फेरीत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माँट्रियल - विंबल्डन विजेतेपदापासून लय गवसलेल्या रॉजर फेडररने शनिवारी मॅंट्रियल मास्टर्स टेनिस स्पर्धेचीही अंतिम फेरी गाठली. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्याने रॉबिन हास याचे आव्हान ६-३, ७-६(७-५) असे मोडून काढले. 

वयाच्या ३६व्या वर्षी देखील सहज खेळणाऱ्या फेडररने हासविरुद्ध नऊ बिनतोड सर्व्हिस केल्या. पूर्ण लढतीत त्याने केवळ नऊ गुण गमावले. सलग १६ लढती जिंकताना गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठे सातत्य आपल्या कामगिरीत राखले. विजेतेपदासाठी त्याची गाठ आता जर्मनीच्या ॲलेक्‍झांडर झ्वेरेव याच्याशी पडणार आहे. फेडररने यापूर्वी दोनदा ही स्पर्धा जिंकली असून, त्याने आतापर्यंत २७ मास्टर्स विजेतीपदे मिळविली आहेत. 

दुसऱ्या उपांत्य लढतीत ॲलेक्‍झांडर झ्वेरेव याने कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याचे आव्हान ६-४, ७-५ असे मोडून काढले.