बाळंतपणानंतर तीन महिन्यांत कोर्टवर!

पीटीआय
Thursday, 17 August 2017

लॉस एंजलिस - गरोदर असलेल्या सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेद्वारे पुनरागमन करण्याचा इरादा असल्याचे सांगितले. याचाच अर्थ बाळंतपणानंतर तीन महिन्यांतच ती कोर्टवर उतरण्याची शक्‍यता आहे. 

तीन महिन्यांतच कोर्टवर उतरण्याचा विचारही खूपच धाडसी असल्याची सेरेनासही कल्पना आहे; पण हे करण्याचा माझा विचार आहे. बाळाच्या जन्मानंतर तीन महिन्यांतच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मार्गारेट कोर्ट हिच्या २४ ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासाठी मी प्रयत्न करणार आहे. या गर्भारपणाच्या काळात माझी ताकद जास्तच वाढली आहे, असेही तिने सांगितले.

सेरेनाने आता लोकांनी आपण ताकदवान खेळ करतो असे म्हणावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्याचबरोबर तिने अनेकांना मी कोत्या मनाची आहे, असे वाटते; पण सहकारी टेनिसपटू मी खूप चांगली असल्याचे सांगतील. मारिया शारापोवा ही सहकारी खेळाडूंबरोबर कधीही बोलत नाही; पण ती लोकांना चांगली वाटते. हे का, तर मी काळी आहे, त्यामुळे मी कोत्या मनाची वाटते; पण काय करणार. याच सोसायटीत राहावे लागते. आफ्रिकन्स-अमेरिकन्सना आपले महत्त्व दाखवण्यासाठी दुप्पट यश मिळवावे लागते. मला याबाबत काहीच प्रॉब्लेम नाही, असेही तिने सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Serena Williams tennis