एटीपी फायनल्समध्ये फेडररची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 November 2017

लंडन - टेनिसच्या मोसमाची अखेर लक्षवेधक करण्यासाठी आतुर असलेल्या रॉजर फेडररने वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत विजयी सलामी दिली. फेडररने या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या अमेरिकेच्या जॅक सॉक याचा ६-४, ७-७(७-४) असा पराभव केला. 

या लढतीत फेडररला एकदाच सर्व्हिस गमवावी लागली. हा एकमेव अपवाद वगळता फेडररने लढतीवर पूर्ण वर्चस्व राखले. दोन्ही सेटमध्ये फेडररने प्रत्येकी दोनवेळा सॉकची सर्व्हिस भेदली. दुसऱ्या सेटमध्ये फेडररने टायब्रेकरमध्ये ४-२ अशी आघाडी मिळविली होती. पण, सॉकने ४-४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर फेडररने सलग तीन गुण घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news tennis competition