टेनिसपटू ऋतुजा-प्रांजला विजेत्या

पीटीआय
Sunday, 22 October 2017

कोलंबो - भारताच्या ऋतुजा भोसलेने देशभगिनी प्रांजला याडलापल्ली हिच्या साथीत आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत त्यांनी नताशा पल्ला-ऋषिका सुंकारा यांना ६-४, ६-१ असे हरविले. ऋतुजा-प्रांजला जोडीला तृतीय; तर प्रतिस्पर्धी जोडीला द्वितीय मानांकन होते. आधीच्या फेरीतही ऋतुजा-प्रांजला यांनी सरस मानांकित जोडीला गारद केले होते. त्यांनी अग्रमानांकित गोझाल अनिंतदिनोवा (कझाकस्तान)-तमारा कुरोविच (सर्बिया) यांना ६-२, ६-३ असे हरविले होते. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी प्रियांका रॉड्रीक्‍स (भारत)-गॅब्रीएला ऑरा झॅर्नोवेयानू (रुमानिया) यांचा ६-०, ६-० असा धुव्वा उडविला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news tennis ITF Tennis Tournament