१०९व्या स्थानावरील टॅरो जोकोविचविरुद्ध विजयी

पीटीआय
Tuesday, 13 March 2018

इंडियन वेल्स - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचच्या पुनरागमनात आणखी एक अडथळा आला. इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत त्याला जपानच्या टॅरो डॅनिएल याने ७-६ (७-३), ४-६, ६-१ असे हरविले. टॅरो १०९व्या स्थानावर असून, त्याने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. रॉजर फेडररने मात्र आगेकूच केली. त्याने फेडेरिको डेल्बोनीसला ६-३, ७-६ (८-६) असे तासाभरात हरविले.

फेडररची आता फिलीप क्रॅजीनोविच याच्याशी लढत होईल. जोकोविच आणि फेडरर या दोघांनी प्रत्येकी पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. जोकोविचला दुखापतींनी त्रस्त केले आहे. जागतिक क्रमवारीत त्याची १३व्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरा सेट जिंकून त्याने आशा उंचावल्या होत्या, पण निर्णायक सेटमध्ये तो एकच गेम जिंकू शकला. त्याचे सोपे फटके ६२ वेळा चुकले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news tennis Novak Djokovic