फेडरर, नदालची दमदार आगेकूच

फेडरर, नदालची दमदार आगेकूच

न्यूयॉर्क - रॅफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी उपांत्य फेरीकडे दमदार पाऊल टाकताना आपली आगेकूच कायम राखली. 

नदालने अर्जेंटिनाच्या लिओनार्डो मेयरचे आव्हान ६-७(३-७), ६-३, ६-१, ६-४ असे संपुष्टात आणले. त्याची गाठ आता युक्रेनच्या ॲलेक्‍झांडर डोल्गोपोलोवशी पडणार आहे. त्याच वेळी सातत्याने पाच सेटपर्यंत झुंजावे लागलेल्या रॉजर फेडररने ३१व्या मानांकित फेलिसियानो लोपेझ याचा ६-३, ६-३, ७-५ असा पराभव  केला. त्याची गाठ आता फिलिप कोलश्रायबरशी पडणार आहे.

प्लिस्कोवाने मॅच पॉइंट वाचवला
महिला गटातील अव्वल मानांकित कॅरोलिन प्लिस्कोवा हिने मॅच पॉइंट वाचवत चीनच्या झॅंग शुआई हिचा ३-६, ५-५, ६-४ असा पराभव केला. तिची गाठ आता जेनिफर ब्रॅडी हिच्याशी पडणार आहे. युक्रेनच्या चौथ्या मानांकित ऐलिना स्विटोलिना हिनेदेखील आपली आगेकूच कायम राखताना शेल्बी रॉजर्स हिचा ६-४, ७-५ असा पराभव केला. 

दरम्यान, रशियाच्या दारिया कॅसाटकिना हिने या वर्षीच्या फ्रेंच ओपन विजेती १२वी मानांकित येलेना ओस्टापेन्को हिचा पराभव केला. कारकिर्दीत प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीपर्यंत आगेकूच करणाऱ्या दारियाने ओस्टापेन्को हिचे आव्हान ६-३, ६-२ असे सहज संपुष्टात आणले. 

अन्य निकाल 
पुरुष ः फिलीप कोलश्रायबर वि.वि. जॉन मिलमॅन ७-५, ६-२, ६-४, डॉमिनिक थिएम वि.वि. आद्रियन मॅन्नारिनो ७-५, ६-३, ६-४, ज्युआन मार्टिन डेल पोट्रो वि.वि. रॉबर्टो बौटिस्टा ६-३, ६-३, ६-४, आंद्रे रुबलेव विवि. दमिर ड्‌झुमहूर ६-४, ६-४, ५-७, ६-४

बिओ फॉग्निनीची हकालपट्टी
दिग्गज टेनिसपटू आगेकूच करत असताना इटलीच्या फॉबिओ फॉग्निनीच्या गैरवर्तनाचे गालबोट स्पर्धेला लागले. महिला पंचांशी असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून त्याची स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली. पहिल्या फेरीत पराभव झालेल्या लढतीत फॉग्निनी याने महिला पंच ल्युसी इंगझेल यांच्याविषयी असभ्य भाषेत टिप्पणी केली. त्यानंतरही तो स्पर्धेत खेळत होता. सिमोने बोलेल्लीच्या साथीत त्याने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला होता; पण त्याच वेळी संयोजकांनी त्याला निलंबित केले. त्याचबरोबर २४ हजार डॉलरचा दंडदेखील केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com