मास्टर फेडररचा विजयी पंचकार

पीटीआय
मंगळवार, 21 मार्च 2017

इंडियन वेल्स (कॅलिफोर्निया) - वयाच्या ३५व्या वर्षी स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने टेनिसविश्‍वातील आपली मास्टरकी सिद्ध केली. इंडियन वेल्स स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावताना त्याने आपलाच देशवासीय स्टॅन वाव्रींकाचा ६-४, ७-५ असा पराभव केला. त्याने पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली. 
फेडररने इंडियन मास्टर्स स्पर्धा पाचव्यांदा जिंकून नोव्हाक जोकोविचच्या विक्रमाची बरोबरी केली. फेडररने यापूर्वी २००४, ०५, ०६ आणि १२मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. 

फेडररने आतापर्यंत वाव्रींकाविरुद्ध झालेल्या २२ लढतींपैकी १९ लढती जिंकल्या होत्या. मात्र, या अंतिम लढतीत त्याला वाव्रींकाने चांगला प्रतिकार केला. पहिल्या सेटमध्ये दहाव्या गेमपर्यंत फेडररला ब्रेकच्या संधीची वाट पाहावी लागली. दुसऱ्या सेटमध्ये व्राव्रींकाने २-० अशी आघाडी मिळवली. मात्र, फेडररने नंतर सलग तीन गेम जिंकत ३-२ अशी आघाडी मिळवली. आघाडीनंतर फेडररचा विजय सहज वाटत होता; पण वाव्रींकाने नंतर त्याला चांगलेच झुंजवले. वाव्रींकाला निर्णायक क्षणी खेळातील अचूकता राखता आली नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Switzerland's Roger Federer