युकीचा सनसनाटी विजय

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 March 2017

झुहाई (चीन) - बिगरमानांकित भारताच्या युकी भांब्रीने एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सनसनाटी विजय नोंदविला. त्याने पाचव्या मानांकित तसेच जागतिक क्रमवारीत 147व्या क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या ब्लाझ कॅविचला 6-1, 6-4 असे दोन सेटमध्येच हरविले. त्याने एक तास 14 मिनिटांतच विजय मिळविला. त्याने पाच सर्व्हिसब्रेक नोंदविले, तर एकदाच सर्व्हिस गमावली. युकीने सांगितले की, "मी भक्कम खेळ केला. माझी सर्व्हिस छान झाली. शक्‍य तेव्हा मी धाडसी फटके मारले.' युकीने पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक मॉटला 6-2, 6-0 असे हरविले होते. युकी जागतिक क्रमवारीत 341व्या स्थानावर घसरला आहे, मात्र त्याने "टॉप हंड्रेड'पर्यंत वाटचाल केली आहे. आता त्याची अर्जेंटिनाच्या आगुस्टीन वेलोट्टी याच्याशी लढत होईल. वेलोट्टी 190व्या स्थानावर आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yuki bhambri win