खतरनाक...! 'या' खेळाडूने क्रिकेट विश्वात उडवून दिली खळबळ, एकही धाव न देता घेतल्या ८ विकेट

 Selvasekaran Rishiyudhan Record
Selvasekaran Rishiyudhan RecordSAKAL

Selvasekaran Rishiyudhan Record : क्रिकेट जगतात असे अनेक विक्रम आहेत जे ऐकल्यावर आश्चर्य वाटत आणि एक प्रश्न पडतो की, हे कसे शक्य आहे. अशा विक्रमांच्या यादीत आणखी एक विक्रम सामील झाला आहे. श्रीलंकेच्या खेळाडूने 9.4 षटकांत एकही धाव न देता 8 विकेट घेतल्या आहेत. याहून आश्चर्याची बाब म्हणजे या खेळाडूचे वय केवळ 10 वर्षे आहे.

श्रीलंकेच्या 10 वर्षीय सेल्वासेकरन ऋषियुधनने ही कामगिरी केली आहे. 13 वर्षांखालील दुसऱ्या विभागाच्या सामन्यात त्याने ही कामगिरी करून आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. या कामगिरीनंतर तो जगभरात प्रसिद्ध झाला आहे.

 Selvasekaran Rishiyudhan Record
Ind vs Aus : ईशानची 'ही' चूक भारतीय संघाला पडली महागात! ऑस्ट्रेलियाला मिळाले इतक्या फुकट धावा; पहा व्हिडिओ

ऋषियुधन हिंदू कॉलेज कोलंबोकडून खेळत होता. त्यांच्या समोर एमडीएच जयवर्धने नावाची शाळा होती. सेल्वासेकरनने 9.4 षटके टाकली. या स्पेलमध्ये त्याने एकही धाव दिली नाही. 9 षटके मेडन राहिली. यासह त्याने 8 फलंदाजांना आपले बळी बनवले. विरोधी संघ केवळ 28 धावांत ऑलआऊट झाला.

मुथय्या मुरलीधरनच्या मूळ गावी असलेल्या या खेळाडूचा आदर्श नॅथन लायन आहे. त्याला त्याच्यासारखेच खेळायचे आहे. तो सहा प्रकारचे चेंडू टाकतो. श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे सेल्वासेकरनचे स्वप्न आहे.

या कामगिरीसाठी शाळेने त्याला क्रिकेट किट भेट दिली आहे. शाळेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'मास्टर सेल्वासेकरन ऋषियुधनचे त्याच्या शानदार गोलंदाजीबद्दल अभिनंदन. त्याने 9.4 षटकात 0 धावा दिल्या आणि आठ विकेट घेतल्या. यामध्ये नऊ मेडन ओव्हर्स होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com