
15th LAKSHYA CUP 2024: भारताच्या होतकरू एअर रायफल नेमबाजांना १५ व्या लक्ष्य कप २०२४ मध्ये आपलं कौशल्य दाखवता येणार आहे. आरआर ग्लोबल प्रायोजित हा स्पर्धा ४ व ५ जानेवारी २०२५ रोजी, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल, नवी मुंबई येथे अत्याधुनिक लक्ष्य शूटिंग क्लबमध्ये होणार आहे. राष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धेतील सध्याचे पुरुष व महिला गटातील विजेते शाहू माने आणि अनन्या नायडू हे लक्ष्य कपमध्ये विजेतेपदासाठी खेळतील. दिव्यांश सिंग पंवर, अर्जुन बबुता आणि संदीप सिंग यांसारखे नामांकित ऑलिम्पियनपटूसुद्धा या स्पर्धेत सहभागी होतील.