ऐश्वर्यप्रतापसिंग तोमरला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

विश्वकरंडक कुमार स्पर्धेतील विजेत्या ऐश्वर्यप्रतापसिंग तोमरने सरदार सज्जन सिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

मुंबई : विश्वकरंडक कुमार स्पर्धेतील विजेत्या ऐश्वर्यप्रतापसिंग तोमरने सरदार सज्जन सिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने रायफल थ्री पोझीशन प्रकारात ही कामगिरी करताना संजीव राजपूतसह अनेक अव्वल स्पर्धकांना मागे टाकले.

18 वर्षीय ऐश्वर्य प्राथमिक फेरीनंतर तिसरा होता. मात्र अंतिम फेरीत त्याने 459.9 गुणांची लक्षवेधक कमाई केली. त्याने अन्य स्पर्धकांना किमान साडेचार गुणांनी मागे टाकले. संजीव राजपूतने रौप्य तर पारुल कुमारने ब्रॉंझ पदक जिंकले. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव असलेले रवी कुमार आणि दीपक कुमार पदकापासून दूर राहिले.

दहा मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत तिनजित धानोता आणि इशा सिंगने सुवर्णपदक पटकावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 year old aishwary win gold in senior shooting championship