
चीनमध्ये कोरोनाचं संकट, एशियन गेम्स स्पर्धा पुढे ढकलली
चीनमध्ये 'हॅगझोवू' येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या १९ व्या एशियन गेम्स पुढे ढकलण्यात आलीय. ऑलम्पिक कॉन्सिल ऑफ एशियाकडुन ही माहीती देण्यात आलीय. ऑलम्पिक कॉन्सिल ऑफ एशियाकडुन ,एशियन गेम्सच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहीती त्यांनी पोस्ट केलीय. १० ते २५ सप्टेंबर दरम्यान एशियन गेम्स होणार होत्या. मात्र गेम्स का पुढे ढकलण्यात आल्या हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. ( 19th Asian games 2022 postponed )
नव्या तारखा घोषित केल्या जातील असंही ऑलम्पिक कॉन्सिल ऑफ एशियाकडुन सांगण्यात आलंय. चीनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला असून २६ शहरांमध्ये लॉकडॉऊन करण्यात आलंय. हॅंगझोवू (Hangzhou) हे पूर्व चीनमधंलं शहर असून, शांघायच्या अगदी जवळ आहे. दरम्यान एशियन गेम्स स्पर्धेची तयारी सुरु होती. गेम्ससाठीचे ५६ ठिकाण पूर्ण झालेत. फेब्रुवारीमध्ये ऑलम्पिकच्या यशस्वी आयोजनानंतर कोरोना नियंत्रण स्थितीत ही स्पर्धा होईल अशी आशा होती. असंही आयोजकांनी सांगितलंय. मात्र सध्याची कोरोनाचं संकट पाहता एशियन गेम्स पुढे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.
इंडियन ऑलम्पिक संघटनेनं देखील स्पर्धा ठरलेल्या नियोजनानुसार होतील असं मागच्या आठवड्यातच स्पष्ट केलं होतं. भारतीय ऑलम्पिक संघटनेचे नरेंदर बत्रा यांना देखील आयोजकांकडून हेच सांगण्यात आलं होतं. 18 वी एशियन स्पर्धा जकार्तामध्ये झाली होती.
Web Title: 19 Th Asian Games Postponed Organizers Shared Info
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..