INDvSA : धरमशालात कोसळधार; पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

वृत्तसंस्था
रविवार, 15 सप्टेंबर 2019

आगामी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार असल्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापक त्याकडे पाहात आहेत.

धरमशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारा पहिला टी-20 सामना संततधार पावसामुळे रद्द करण्यात आला. याची अधिकृत माहिती बीसीसीआयने ट्विटरवरून दिली. धरमशाला येथे गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.

रविवारी (ता.15) दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सामना उशिरा खेळविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. काही वेळाने पाऊस ओसरला. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.  

रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे मैदानात पाणी साचले होते. ते पाणी काढण्यासाठी काही कर्मचारी मैदानात उतरले. मात्र, पावसाचा जोर वाढतच गेला. शेवटी सामना रद्द करण्यात आला. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तीन टी-20 सामने होणार आहेत. त्यापैकी आज धरमशाला येथे होणारा पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. चंदीगड येथे दुसरा टी-20 सामना बुधवारी (ता.18) होणार असून तिसरा टी-20 सामना रविवारी (ता.22) बेंगलोर येथे होणार आहे. 

- INDvSA : टी-20 संघातील खेळाडूंना विराटचे आवाहन

आगामी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार असल्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापक त्याकडे पाहात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1st T20 between India and South Africa abandoned due to heavy rain in Dharamshala