esakal | आता एम्मा राडूकानू विरुद्ध लैला फर्नांडिज
sakal

बोलून बातमी शोधा

आता एम्मा राडूकानू विरुद्ध लैला फर्नांडिज

आता एम्मा राडूकानू विरुद्ध लैला फर्नांडिज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : ''ते म्हणतात ना, आपल्यानंतर जन्म घेणारी युवा पिढी नेहमी आपल्यापेक्षा दोन पावलं पुढे असते'', अगदी तसेच काहीसं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत घडले आहे. अनेक अनुभवी खेळाडूंचा पराभव करीत कॅनडाच्या १९ वर्षीय लैला फर्नांडिजने व ग्रेट ब्रिटनच्या १८ वर्षीय एम्मा राडूकानूने ऐतिहासिक अंतिम फेरीत धडक मारली.

राडूकानू तर गेल्या १७ वर्षांमधील ‘ग्रँड स्लॅम’ स्पर्धांच्या इतिहासात १७ व्या क्रमांकावरील मारिया सक्कारीचा ६-१,६-४ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारणारी सर्वांत तरुण स्पर्धक ठरली आहे. "मी आता अंतिम फेरीत प्रवेश केलाय याचा मला विश्वासच बसत नाहीये",अशा भावना राडूकानूच्या यावेळी होत्या.

तर दुसरीकडे ७३ व्या स्थानावरील फर्नांडिजने दुसऱ्या क्रमांकावरील बेलारूसच्या आर्यना सबालेंकाचा ७-६(३),४-६,६-४ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. हा तिचा अव्वल पाच खेळाडूंवरील तिसरा ऐतिहासिक विजय ठरला, असा पराक्रम यापूर्वी सेरेना विल्यम्सने २०१२ च्या विम्बल्डनमध्ये केला होता. "मी माझे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने चांगली कामगिरी केलीय, असे आता म्हणू शकते." अशी भावना फर्नांडिजची होती. अगदी एखाद्या काल्पनिक परीकथेतील पात्राप्रमाने या दोन युवती सुप्रसिद्ध ‘आर्थर अॅश स्टेडियम’वर शनिवारी एकमेकांविरुद्ध भिडतील, व दोघींतील एक स्वतःचे पहिले-वहिले ‘ग्रॅड स्लॅम’ विजेतेपद घरी घेऊन जाईल.

मी कशी जिंकले याची मला कल्पना नाही,परंतु मी सातत्याने घेत असलेल्या कष्टाचे हे फळ आहे,आता मला फक्त अंतिम फेरीत खेळण्याचा पुरेपूर आनंद लुटायचा आहे.

- लैला फर्नांडिज

राडूकानूची कामगिरी

  • मारिया शेरापोवानंतर अंतिम फेरी गाठणारी सर्वांत तरुण स्पर्धक

  • अंतिम फेरी गाठणारी पहिल्या शंभर क्रमांकांनंतरची दुसरी खेळाडू

  • ब्रिटनतर्फे १९७७ नंतर अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला टेनिसपटू, यापूर्वी व्हर्जिनिया वेडच्या नावे हा विक्रम

  • स्पर्धेत एकही सेट न गमविणारी सेरेना विल्यम्सनंतर दुसरी खेळाडू

‘यूएस ओपन’मध्ये आज

  • फेलिक्स ऑगर विरुद्ध डॅनिल मेदवेदेव

  • नोवाक जोकोविच विरुद्ध अलेक्झांडर झ्वरेव

loading image
go to top