
सुनील गावसकराचं मुख्यमंत्र्यांसह जितेंद्र आव्हाडांना पत्र; घेतला मोठा निर्णय...
क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना वांद्रे (पश्चिम) येथे जमिनीचा मुख्य तुकडा वाटप केल्यानंतर सुमारे 33 वर्षांनंतर, यांनी म्हाडाला जमीन परत केली आहे. कारण ते आश्वासनानुसार अकादमी बांधू शकले नाहीत. 2019 मध्ये म्हाडाने 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात सुनील गावसकर क्रिकेट फाऊंडेशन ट्रस्टला (SGCFT) दिलेली होती. 21,348 चौरस मीटर भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव पाठवला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नव्या आवाहनानंतर सुनील गावसकर यांनी ही जमीन म्हाडाला परत केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि मला पत्र लिहून क्रिकेट अकादमीचा नियोजित विकास करू शकत नाही, त्यामुळे जमीन परत देत असल्याचे आव्हाड म्हणाले आहे.(Sunil Gavaskar Returns Cricket School Plot Mhada)
हेही वाचा: Oops! रन वाचवायला गेला पण पँट सुटली; IPL सामन्यातला VIDEO व्हायरल
म्हाडाने डिसेंबर 2019 मध्ये गावसकर यांच्या ट्रस्टसोबतचा करार रद्द करण्याची विनंती करून सरकारला संपर्क केला होता. त्यानंतर गावसकर यांनी सचिन तेंडुलकरला एका उपक्रमात सहभागी करून घेतले आणि दोघांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. गावसकर यांनी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली, ज्यामुळे ठाकरे यांनी म्हाडाला क्रिकेटच्या दोन दिग्गजांनी वांद्रे येथील भूखंडावर अकादमी उभारता येईल का याची तपासणी करण्यास सांगितले.
गावसकर यांनी TOI ला सांगितले की त्यांनी जमीन परत केली आहे. ट्रस्टने जमीन सरकारला परत केली होती. माझी सध्याचे काम जास्त चालू आहे त्यामुळे मी माझे स्वप्न असलेल्या अकादमीच्या स्थापनेला न्याय देऊ शकणार नाही. जर म्हाडाला स्वत:च्या विकासात पुढे जायचे असेल आणि माझ्याकडून काही हवे असतील तर मला ते करण्यात आनंद होईल.
Web Title: 33 Years On Sunil Gavaskar Returns Cricket School Plot Mhada Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..