
38th National Games: उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. नाशिकच्या आर्या बोरसे अपेक्षेप्रमाणे रूपेरी यशाचा नेम साधून नेमबाजीतील महाराष्ट्राच्या पदकाचे खाते उघडले. तिने 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पदक खेचून आणले. कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सायकलिंगमध्ये सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. तर महाराष्ट्राच्या पुरूष खो-खो संघाने कर्नाटकला धूळ चारत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.