Virat Kohli AB De Villiers : एबी डिव्हिलियर्सनं चुकीची माहिती पसरवली, विराट कोहलीबद्दलचा 'तो' दावा खोटा?

Virat Kohli AB Villiers Family First : विराटबद्दलच्या वक्तव्यावर एबी डिव्हिलियर्सने अखेर स्पष्टीकरण दिलं.
Virat Kohli AB De Villiers
Virat Kohli AB De VilliersESAKAL

Virat Kohli AB Villiers Family First : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहलीने कौटुंबिक कारणास्तव माघार घेतली होती. आता पुढच्या तीन कसोटी सामन्यांसाठी देखील तो उपलब्ध राहणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. मिळालेल्या माहितीनुसार विराट उर्वरित तीन सामन्यांसाठी देखील उपलब्ध असणार नाही.

Virat Kohli AB De Villiers
भारताच्या विजयानंतर बांग्लादेशी फॅन्सचा मैदानावरच राडा! महिला संघावर दगडफेकीनंतर बदलला निकाल

दरम्यान, विराटचा चांगला मित्र असलेल्या एबी डिव्हिलियर्सने नुकचे आपल्या युट्यूब चॅनलवरून विराट कोहली आपल्या दुसऱ्या अपत्याच्या प्रतिक्षेत आहे. विराटने कुटुंबाला सर्वात आधी प्राधान्य दिलं आहे असं म्हणाला होता. मात्र आता एबी डिव्हिलियर्सने घुमजाव केलं आहे. त्याने विराटबाबतची खोटी माहिती दिल्याचे सांगितले.

विराट कोहलीच्या कथित कुटुंब प्रथम या वक्तव्यावरून भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यानंतर एबी डिव्हिलियर्सने यावर स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला की, 'कुटुंब सर्वात प्रथम असं मी माझ्या युट्यूब चॅनलवर बोललो होतो. मी खोटी माहिती देऊन एक मोठी चूक केली होती. मी जे म्हणालो ते खरं नाहीये. त्यामुळे मला वाटतं की विराट आणि कुटुंबासाठी जे योग्य आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. तिथं काय होतय हे कोणालाच माहिती नाहीये. मी फक्त त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो.'

Virat Kohli AB De Villiers
Ranji Trophy : मुंबईचा बाद फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्‍चित ; रहाणे, शार्दुल, तुषार देशपांडेच्या पुनरागमनामुळे ताकद वाढली

डिव्हिलियर्स पुढे म्हणाला की, 'संपूर्ण जग विराट कोहलीला फॉलो करत, त्याचं क्रिकेट एन्जॉय करतात. त्याच्यासाठी फक्त प्रार्थना करू शकतो. त्याने कोणत्याही कारणाने ब्रेक घेतला असेल आशा आहे की तो जोरदार पुनरागमन करेल.'

(Sports Latest New)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com