FIFA WC22 : टी-शर्ट काढून झाला उघडा, शेवटी... ब्राझील विरुद्ध गोल करणाऱ्याला दणका

Aboubakar gets red card after scoring for Cameroon against Brazil in the FIFA World Cup football marathi news
Aboubakar gets red card after scoring for Cameroon against Brazil in the FIFA World Cup football marathi newsSAKAL
Updated on

FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषक 2022 च्या शेवटच्या गट सामन्यात मोठा अपसेट पाहिला मिळाला. येथे कॅमेरूनने ब्राझीलचा रोमहर्षक पराभव केला. संपूर्ण 90 मिनिटे 0-0 अशी बरोबरी असताना दुखापतीच्या वेळेत (90+2 मिनिटे) गोल करण्यात आला. कॅमेरूनच्या अबुबाकरने हा गोल केला. या गोलच्या जोरावर कॅमेरूनने ब्राझीलवर 1-0 असा विजय मिळवला. मात्र, या मोठ्या विजयानंतरही कॅमेरोनियन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.

रात्री झालेल्या सामन्यात गोल करणारा अबुबेकरने जल्लोषाच्या नादात अंगातील टी शर्ट काढून हवेत फिरविला आणि त्याच क्षणी पंचांनी त्याला रेड कार्ड दाखवत मैदानाबाहेरचा रस्ता दाखविला. 

बलाढ्य ब्राझीलला पराभूत केल्यानंतर कॅमेरूनने इतिहास रचला. फिफा विश्वचषकात ब्राझीलला पराभूत करणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला. उत्तरार्धात ब्राझीलच्या गोलपोस्टवर सतत धडका देणाऱ्या कॅमेरूनला अगदी 90 व्या मिनिटाला गोल करण्यात यश आले. उजव्या बगलेतून चेंडू घेऊन सुसाट सुटलेल्या नोगम बँकलीने उंचावर थेट डीच्या मध्यभागी पास दिला. ब्राझीलच्या तीन रक्षकांमध्ये घुसत अबुबेकरने त्यांच्या देशासाठी संस्मरणीय गोल गेला आणि तोच त्यांच्या विजयासाठी पुरेसा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com