esakal | विराटला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंची IPL मधून माघार

बोलून बातमी शोधा

Virat Kohli
विराटला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंची IPL मधून माघार
sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. दिवसाला साडेतीन लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीतही भारतामध्ये बायो बबलच्या माध्यमातून आयपीएलचा महासंग्राम सुरु आहे. 9 एप्रिल रोजी मुंबई आणि आरसीबी यांच्या सामन्यानं हा रनसंग्राम सुरु झाला होता. आता जवळपास तीन आठवडे उलटले आहेत. पाच सामन्यानंतर विराट कोहलीचा आरसीबी संघ चार विजयासह गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थिती विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनी वयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. आरसीबीनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

युवा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. आरसीबीनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबतची माहिती दिली आहे. 'अधिकृत घोषणा! अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन वयक्तिक कारणामुळे ऑस्ट्रेलियात परतणार आहेत. त्यामुळे उर्वरित आयपीएल सामन्यासाठी ते अनुपलब्ध असतील. त्यांच्या या निर्णयाचा आरसीबी संघ व्यवस्थापनानं आदर केला असून पाठिंबाही दर्शवला आहे. '

आयपीएलच्या 14 व्या हंगामात आतापर्यंत फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. तर केन रिचर्डसन याला मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयश आलं आहं. रिचर्डसन गोलंदाजी महागडा ठरलाय.

विराट कोहलीच्या आरसीबी संघानं यंदाच्या आयपीएल स्पर्धेमध्ये दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्या पाच लढतीपैकी चारमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे समान गुण असणारा चेन्नईचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे.