Cricket In Olympics : तब्बल 128 वर्षांनी जंटलमन्स गेम परतणार; लॉस एंजेलेस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा खेळ रंगणार?

Cricket In Olympics 2028
Cricket In Olympics 2028esakal

Cricket In Olympics 2028 : ऑलिम्पिक गेम्समध्ये जगभरातील जवळपास सर्व प्रसिद्ध खेळांचा समावेश आहे. मात्र याला अपवाद होता तो फक्त क्रिकेटचा! परंतु आता हा अपवाद देखील राहणार नाहीये. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होणे जवळपास निश्चित झाले आहे.

जंटलमन्स गेम्स म्हणून ओळख असलेल्या क्रिकेटचा 2028 मध्ये लॉस एंजेलेसमध्ये होणाऱ्या आणि त्याच्या पुढच्याही ऑलिम्पिक गेम्समध्ये समावेश करण्याबाबत सर्वत्र सकारात्मक वातावरण आहे. (Los Angeles Olympics 2028)

Cricket In Olympics 2028
Team India WC : वर्ल्ड कपआधी टीम इंडिया खेळणार 19 सामने! जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार ऑलिम्पिक गेम्समध्ये पुरूष आणि महिला टी 20 क्रिकेटचा समावेश होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी क्रिकेटपटू आता ऑलिम्पिक पदक देखील मिरवणार आहेत.

जर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तर त्याचा फायदाच होणार आहे. कारण आशियामधील अनेक देशांमध्ये क्रिकेटची मोठी क्रेज आहे.

सादर केलेल्या प्रस्तावानुसार पाच संघ यामध्ये सहभागी होतील. या संघांची पात्रता ही आयसीसीच्या वर्ल्ड रँकिंगनुसार ठरवली जाईल. यापूर्वी 1900 मध्ये पॅरिस येथे झालेल्या एकमेव सुवर्ण पदकाचा क्रिकेट सामना झाला होता. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये कधीही क्रिकेट खेळलं गेलं नाही.

महिला टी 20 स्पर्धा ही 2022 च्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत खेळवली गेली होती. आयसीसीसाठी हे एक यश होते. यापूर्वी आयसीसी (ICC) ऑलिम्पिक गेम्समध्ये सामील होण्यास फारसे उत्सुक नव्हते. मात्र आता क्रिकेटचा जगभरात प्रसार करण्यासाठी आयसीसी गेल्या काही वर्षात फार सक्रीय झाले आहे.

आंतरराष्ट्र ऑलिम्पिक समितीने लॉस एंजेलेस ऑलिम्पिकसाटी नऊ खेळ शॉर्टलिस्ट केले आहेत. यात क्रिकेटसोबतच बेसबॉल / सॉफ्टबॉल, प्लॅग फुटबॉल, लॅक्रोसे, ब्रेकडान्सिंग, कराटे, किकबॉक्सिंग, स्वाश, रेसिंग यांचा देखील समावेश आहे. हे सर्व क्रीडा प्रकार हे आर्थिक दृष्ट्या चांगली कमाई करून देणारे आहेत.

Cricket In Olympics 2028
Kavya Maran-Rajinikanth : हैदराबादची मालकीण काव्या मारनला उदास नाही पाहू शकत रजनीकांत, SRH ला दिला हा सल्ला

सध्याचे भारतातील काही ऑलिम्पिक सामन्यांसाठीच्या प्रसारण हक्कांचा लिलावा झाला आहे. पॅरिस 2024 च्या ऑलिम्पिक प्रसारण हक्कातून जवळपास 20 मिलियन डॉलर्स कमाई होण्याचा अंदार वर्तवला जात आहे.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार जर लॉस एंजेलेस आणि ब्रिसबेन ऑलिम्पिकमध्ये (2032) क्रिकेटचा समावेश झाला तर प्रसारण हक्कातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आकडा हा जवळपास 150 मिलियन पाऊंड्सपर्यंत जाईल. मात्र हे सर्व गणित त्याचा फॉरमॅट आणि भारत किती सामने खेळणार याच्यावर अवलंबून असले.

या सर्व गोष्टी सतत्यात उतरणार की नाही याची लिटमस टेस्ट ही वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्स येथील जून 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये होणार आहे. जर लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर इंग्लंडचा संघ हा ग्रेट ब्रिटनचा संघ म्हणून स्पर्धेत उतरेल.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com